पंचनामा मृत्यूचे सापळे

मृत्यूचे सापळे?

इस्कॉन मंदिर कडून गंगा धाम चौका कडे जाणाऱ्या रस्त्यावर वर्धमान सांस्कृतिक भवना पुढे डाव्या हाताला रस्त्याला लागून एक मोठी साइड पट्टी आहे. सध्या या रस्त्यावर आई माता मंदीरा जवळील तीव्र उतार कमी व्हावा म्हणून काम सुरू असून एकेरी वाहतूक सुरू आहे. ही साइड पट्टी सुमारे १२ फूट रुंद असून जर व्यवस्थित करून वाहतुकीसाठी उपलब्ध केली तर भरपूर रुंदीचा रस्ता वापरायला मिळेल. सध्या या पट्टीकडे दुर्लक्ष झालेले असून त्यावर अनेक मोठे खड्डे आहेत आणि ड्रेनेज ची झाकणे मृत्यूचा सापळा बनून वर आलेली आहेत. उतार कमी करण्याचे काम सुरू करण्या आधी ही पट्टी रुंद करण्याचे का सुचले नाही हे आश्चर्य आहे. या रस्त्यावर अनेक जीवघेणे अपघात झालेले असून रोज हजारो तसंच वेळ आणि इंधन वाया जाते. मृत्यूचा सापळा बनून वर आलेली ड्रेनेज ची झाकणे योग्य पातळीत केली नाही तर कोणाचा तरी कपाळ मोक्ष निश्चित आहे.

1 Comment

Leave a Comment